मुकेश अंबानी हे देशातील श्रीमंत उद्योगपती आहेत. मुकेश अंबानी आणि
नीता अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची
तारीख अखेर ठरली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे येत्या 12
जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. हा शाही विवाहसोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे.
पारंपरिक हिंदू रितीनिवजानुसार अनंत
अंबानी आणि राधिका यांचा विवाह होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याची सर्वांना
उत्सुकता आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची पत्रिका सोशल
मिडियावर शेअर करण्यात आली आहे. दरम्यान २९ मे पासून अनंत अंबानी आणि राधिका
मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या लग्नसोहळ्याला मनोरंजन,
राजकीय,
उद्योग
आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.