राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या वरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक भाजपाच्या वतीने नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने सीबीएस शालिमार रस्त्यावरती असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
आंदोलनामध्ये भाजपाचे महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे महानगर अध्यक्ष राकेश दोंदे, आ. देवयानी फरांदे आ. राहुल आहेर, आ. राहुल ढिकले, आ. सिमा हिरे, उत्तम उगले, विजय साने, लक्ष्मण सावजी, शिवाजी गांगुर्डे,पवन भगुरकर, मुकेश शहाणे,सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, ॲड.शाम बडोदे, हिमगौरी आडके, रोहिणी नायडू व उध्दव निमसे यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही महाड येथील चवदार तळ्यावर स्वताची राजकीय पोळी भाजण्यासाठी एक आंदोलन केले, याच आंदोलनांत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाडयांनी फाडून टाकला, कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही स्वताच्या मस्तीत मग्न असलेले जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांच्या फोटोचे तुकडे तुकडे केले. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली आहे .