लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील पश्चिम बंगालमधल्या मथुरापूर आणि दक्षिण 24 परगणामधील बारासातमध्ये मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आज सोमवारी पुन्हा मतदान होत आहे. या दोन्ही मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय दल आणि राज्य पोलिसांच्या सशस्त्र जवानांच्या देखरेखीखाली मतदान होत आहे. मतदान केंद्रांभोवती गर्दी जमू नये यासाठी बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हिंसाचारावर कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी मथुरापूरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुप्त मतदानाचा आरोप करण्यात आला, त्यानंतर संतप्त जमावाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी उचलून तलावात फेकले होते. यावर निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला होता पण नंतर येथे फेरमतदानाचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे बारासातमध्येही मतदानात गडबड झाल्याचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला प्राप्त झाले होते, त्यानंतर विरोधी पक्षांच्या मागणीनुसार येथे पुन्हा मतदान घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.