लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप तीन जागा लढविणार आहे. मुंबई, कोकण आणि मुंबई शिक्षक अशा तीन जागा लढविणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना तर, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार आणि मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मनसे कडून अभिजित पानसे यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. त्यांची निवड कोकण मतदारसंघासाठी करण्यात आली होती.
मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी दिल्याने निरंजन डावखरे यांचे काय होणार अशी चर्चा रंगली होती. अभिजित पानसे हे महायुतीचे उमेदवार आहे कि मनसेचे स्वतंत्र उमेदवार अशी चर्चा सुरु होती. मात्र भाजपने आता आपली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.