लोकसभेच्या मतमोजणीला सुरवात झाली असून राज्यात महायुती विरोधात महाविकासआघाडी असा सामना बघायला मिळणार आहे.
आतापर्यंतच्या चित्रात अटीतटीचा सामना आतापर्यंतच्या कलांनुसार महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान जागांवर आघाडीवर. दिसत आहे मुंबईतील पहिल्या कलांमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी मुसंडी मारली आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर आहेत.सुरवातीला बारामतीत सुप्रिया सुळेंना पिछाडीवर टाकत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतली होती मात्र पुन्हा एकदा सुप्रिया सुळे आघाडीवर येताना दिसत आहेत.
मुंबईचे पहिले कल हाती आले असून सहापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
अरविंद सावंत – द. मुंबई (आघाडीवर)
अमोल किर्तीकर – वायव्य मुंबई (आघाडीवर)
पियूष गोयल – उत्तर मुंबई (आघाडीवर)
राहुल शेवाळे – द.मध्य मुंबई (आघाडीवर)
वर्षा गायकवाड – उत्तर मध्य मुंबई (आघाडीवर)
संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई (आघाडीवर)
प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीला जागा मिळणार नसल्याचा अंदाज एक्जिट पोलमध्ये वर्तवला गेला होता. समोर आलेल्या एक्जिट पोलच्या आकड्यावरुन प्रकाश आंबेडकरांना जागा मिळणं अवघड झाल्याचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. वंचित आघाडी सध्या सर्वच जागेवरुन वंचित आघाडी पिछाडीवर असून आकडे पडत असल्याचे दिसून येत आहे.
साताऱ्यात भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवड़णूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती.आता सुरवातीच्या मतमोजणीत उदयनराजे भोसले आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.