लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रात महायुतीची अवस्था बिकट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात बारामती, माढा यानंतर सांगलीच्या जागेची सर्वात जास्त चर्चा होती. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच होती. काँग्रेस या जागेवर असून राहिली होती. अखेर ठाकरे गटाकडे जागा गेल्याने काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अप्सकः उमेदवारी भरला होता. दरम्यान आजच्या मतमोजणीच्या वेळेस अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील हे सध्या आघाडीवर आहेत.
सांगलीत भाजपाचे संजय पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होत आहे. मात्र या रेसमध्ये चंद्रहार पाटील कुठेच दिसत नाहीयेत. विशाल पाटील यांनी सांगलीतील ६ ठिकाणी आघाडी घेतली आहे. मतमोजणीचे कल सतत बदलत आहेत. त्यामुळे अखेरच्या फेरीचे मोजणी पूर्ण होईपर्यंत विशाल पाटील यांनी लीड कायम राखले तर त्यांचा विजयी होण्याची शक्यता जास्त वाटत आहे.