जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतासाठी अत्यंत महत्वाचा
दिवस आहे. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सर्व देशभरात मतमोजणी सुरु
आहे. महाराष्ट्रात पुणे लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार याची चर्चा सर्वत्र सुरु
होती. महायुतीने मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर आणि
वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली होती. निकालाआधी
तीनही नेते आपापल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत होते. मात्र आताच्या काही
फेऱ्यांची मतमोजणी सुरु झाल्यानंतर महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचे पाहायला
मिळत आहे.
महायुतीचे उमेदवार आणि पुण्याचे माजी
महापौर मुरलीधर मोहोळ हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असल्याचे पाहायला
मिळत आहे. सध्या मुरलीधर मोहोळ हे ४६ हजारांपेक्षा जास्तीच्या मतांनी पुढे आहेत.
दुसऱ्या क्रमांकांवर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि तिसऱ्या क्रमांकांवर वसंत मोरे
यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मोहोळ यांनी आपली आघाडी अशीच कायम ठेवली तर मोहोळ
यांचा विजय सहज होण्याची शक्यता आहे.