लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा निकाल जाहीर होत आहे. दरम्यान आज
संध्याकाळपर्यंत देशात कोणाची सत्ता येणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार
याचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज लोकसभेबरोबरच आज ओडिशा विधानसभेचा निकाल
देखील जाहीर झाला आहे. ओडिशामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. भाजपाने ओडिशा
विधानसभेत बहुमत प्राप्त केले आहे. तर यामुळे नवीन पटनायक यांना मोठा धक्का बसला
आहे.
ओडिशा विधानसभेत एकूण १४७ विधानसभेच्या
जागा आहेत. त्यापैकी भाजपाने ७५ जागांवर विजय मिळविला आहे. तर बीजेडी पक्षाने ५९
जागांवर विजय मिळविला आहे. तसेच काँग्रेसने १३ तर अन्य पक्षांनी ३ जागा जिंकल्या
आहेत. ओडिशात लोकसभा आणि विधानसभेत भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे. दरम्यान,
भाजपाने
ओडिशामध्ये लोकसभा निवडणुकीत १८ जागांवर आघाडी घेतली आहे.