काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तर भाजपाला वैयक्तिकपाने बहुमत गाठता आलेले नाही. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. दरम्यान एनडीएने २९२ जागांवर तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळविला आहे. एनडीएमध्ये २९२ पैकी भाजपने एकूण २४० जागा जिंकल्या आहेत’ त्यामुळे जरी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार असले तरी देखील त्यांना एनडीएतील घटक पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. दरम्यान आज दिल्लीत एनडीएचे बैठक आयोजित करण्यात आली आहे दरम्यान कालच्या एनडीएच्या विजयानंतर मालदीवचे पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या विजयाबद्दल मालदीवच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. याबद्दल त्यांनी आपल्या X हँडलवरील अभिनंदन संदेशात आनंद व्यक्त केला आहे. मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी लिहिले आहे की, “2024 च्या भारतीय लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA यांचे अभिनंदन. दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धी आणि स्थिरतेच्या दिशेने आमचे समान हितसंबंध वाढवण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”