18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल कल जाहीर झाल्यानंतर, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जालोर मतदारसंघातून त्यांचा मुलगा वैभव गेहलोत यांच्या पराभवाबद्दल बोलताना म्हणाले आहेत की, “ही जागा जिंकणे कठीण होते” .वैभव गहलोत यांचा भाजपच्या लुम्बाराम चौधरी यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. आहे.
पत्रकारांशी बोलताना पुढे अशोक गहलोत म्हणाले, “ही एक कठीण जागा होती. , गेल्या 20 वर्षांपासून आम्ही ती जागा जिंकलेली नाही. तरीही देशातील परिस्थिती,आपल्यासमोरील आव्हाने आणि पुढच्या वेळी निवडणुका घेण्याबाबतची अनिश्चितता, अशा परिस्थितीत निवडणुका झाल्या.”
पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आम्ही जिंकलो किंवा हरलो तरी मैदानात भक्कमपणे उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला सुरुवातीपासूनच माहित होते की ही जागा खूप अवघड आहे. मात्र. देशाची, राज्याची आणि काँग्रेसची परिस्थिती समजून वैभव गहलोत यांनी तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला… आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचला आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
निवडणुकीत विजय-पराजय होतच असतो, असे सांगत गहलोत म्हणाले आहेत की , तुमच्या हृदयात सेवेची भावना असेल, तर पराभव काय आणि विजय काय?
विशेष म्हणजे, भाजपने राजस्थानमध्ये 25 पैकी 14 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेस नी आठ जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत आदिवासी पक्ष यांनी प्रत्येकी एक जागा जिंकल्या आहेत
2019 च्या निवडणुकीत 24 जागा मिळवून राजस्थानमध्ये बहुमत मिळविणाऱ्या भाजपने यावेळी 14 जागा मिळवल्या आहेत.तर काँग्रेसने 2019 मध्ये शून्य जागा मिळवून 2024 च्या निवडणुकीत 8 जागा मिळवून शानदार बाजी मारली आहे.
जालोर मतदारसंघात भाजपचे लुम्बाराम यांनी काँग्रेसच्या वैभव गहलोत यांचा २,०१,५४३ मतांनी पराभव केला असुन , लुम्बाराम यांना 7,96,783 मते मिळाली तर वैभव गहलोत यांना 5,95,240 मते मिळाली आहे