आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टी-२० वर्ल्ड कपचा फायनल मॅच होणार आहे. वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. भारताने 2013 पासून आयसीसीचे विजेतेपद जिंकलेले नाही, तर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर त्यांनी सर्व फॉरमॅटमधील शेवटच्या सात विश्वचषक उपांत्य फेरीत पराभव पत्करला आहे, परंतु आज रात्री हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. आज दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
भारताने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांचे खडतर आव्हान संघाने सहज पेलले आहे. न्यू यॉर्कमधील कमी धावसंख्येच्या सामन्यांपासून ते सेंट लुसिया येथील वाऱ्याने प्रभावित झालेल्या सामन्यांपर्यंत, भारताने कायम विजय मिळविला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर 8 टप्प्यात, हार्दिकने बॅटने चमकदार कामगिरी केली आणि एक उत्कृष्ट फिनिशर म्हणून उदयास आला. कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण मैदानात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला आणि अवघ्या 41 चेंडूत 92 धावा केल्या. यानंतर त्याने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ५७ धावांची शानदार खेळी केली.
दरम्यान सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा सेमीफायनल सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने २०२२ मधील फायनलचे उट्टे फेडले आहे. इंग्लंडला ६८ धावांनी पराभूत करून भारताने दिमाखत टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज बार्बाडोस येथे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात फायनल होणार आहे. भारतीय वेळेनुसार अंतिम सामना हा ८ वाजता सुरू होणार आहे.