युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी डॉ.मांडविया यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, देशातील नागरिकांनी तंदुरुस्त व निरोगी राहावे. सुदृढ नागरिक निरोगी समाजाची निर्मिती करतो आणि निरोगी समाज समृद्ध देशाची निर्मिती करतो याचबरोबर मांडवीया यांनी सर्व नागरिकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून एक तास काढून त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ खेळावा आणि तंदुरुस्त राहावे.असा संदेश दिला आहे.
ते म्हणाले, “आम्ही मेजर ध्यानचंद जी यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करत आहोत. पंतप्रधान मोदींनी अगदी बरोबर म्हटले आहे की, जे खेळतील ते ते पुढे जातील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भारताला एक तंदुरुस्त राष्ट्र बनवण्याचे असून त्यांनी ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ असा त्यांनी दिलेला नारा अगदी समर्पक आहे.
तत्पूर्वी, डॉ. मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व नागरिकांना किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आजच्या देशव्यापी उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.
देशातील खेळांची परंपरा जपण्यासाठी आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आदरांजली वाहण्यासाठी आज 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन देशभरात साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना या दिवसाच्या निमित्ताने अभिवादन केले जाते.आज त्यांची 113वी जयंती आहे.
या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो.