भारताचा वेगवान गोलंदाज असणारा मोहम्मद शमी मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेपासून दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.असं असे असताना आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत हंगामासाठी बंगालच्या 31 सदस्यांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
तो रणजी स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल असे सांगितले जात आहे .बंगाल संघातून मोहम्मद शमी 11 ऑक्टोबरला युपी विरुद्ध रणजी स्पर्धेत उतरू शकतो. त्यानंतर दुसरा सामना 18 ऑक्टोबरला बिहार विरुद्ध आहे. हा सामना कोलकात्यात होणार आहे. शमी या दोन पैकी एका सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
तसेच सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेतून शमी क्रिकेटमध्ये परत तर टीम इंडिया 19 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. शमीने अवघ्या 7 सामन्यांमध्ये तब्बल 24 विकेट्स घेत टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली होती. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली होती आणि आता परत एकदा मैदानात शमीच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळणार आहे.