आजपासून आयपीलचा (IPL ) १७ वा हंगाम सुरू होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. तर संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आयपीलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. तर आयपीएल स्पर्धेत चेन्नई आणि मुंबई या दोन संघांनी सर्वात जास्तवेळा विजेतेपदत पटकविले आहे. त्यातील बलाढ्य संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. यज्ञा मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. दरम्यान मुंबईच्या संघाने आयपीएलची पूर्वतयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात सर्व करताना दिसून येत आहेत.
सध्या या सरावामध्ये माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना दिसून येत आहे. यावेळी सरावादरम्यान रोहित शर्मा मोठे फटके मारण्याचा सराव करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये तो ज्या प्रकारे फटके मारताना दिसत आहे, त्यामुळे विरोधी संघाच्या गोलंदाजांचे टेन्शन नक्कीच वाढले असणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने विजतेपदाला गवसणी घातली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई आणि बंगलोर या दोन संघामध्ये होत होणार आहे. त्यामुळे एमएस धोनी आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना कोण जिंकणार आणि या स्पर्धेची सुरुवात कोण गोड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या ७ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे उर्वरित वेळापत्रक जाहीर झालेले नाही. २४ मार्च रोजी पाच वेळा विजतेपद पटकावलेले मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि गेल्यावर्षीचे उपविजेता गुजरात टायटन्स हे समोरासमोर येणार आहेत. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.