आजपासून आयपीलचा (IPL ) १७ वा हंगाम सुरू होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. तर संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आयपीलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. तर आयपीएल स्पर्धेत चेन्नई आणि मुंबई या दोन संघांनी सर्वात जास्तवेळा विजेतेपदत पटकविले आहे. तर पहिला आयपीएलचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. आज चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर सामना होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत चेन्नईचा सामना कर्णधार ऋतुराज गायकवाड असणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नईच्या संघातून रचिन रवींद्र पदार्पण करण्याची शक्यता आहे. तसेच या संघात नवीन चेहरे देखील खेळणार असल्याची चर्चा आहे. भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी यंदाच्या स्पर्धेत केवळ यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळणार आहे. तसेच बंगलोर संघात देखील काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. बंगळुरूच्या संघात विराट, फाफ डू प्लेसीस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल हे कायम राहू शकतात. तसेच कॅमेरून ग्रीन देखील बंगळुरू संघातून पदार्पण करू शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे आतापर्यंत आमने-सामने ३१ सामने खेळले आहेत. त्यातील २० सामने चेन्नईने जिंकले आहेत. तर १० सामने बंगलोर संघाने जिंकले आहेत. एक सामन्याचा निकाल लागलेला नाहीये. दरम्यान बलाढ्य संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. यज्ञा मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. दरम्यान मुंबईच्या संघाने आयपीएलची पूर्वतयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात सर्व करताना दिसून येत आहेत.