कालपासून म्हणजेच २२ मार्चपासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. काल सलामीचा सामना चेन्नई आणि बंगलोर यांच्या खेळला गेला. या सामन्यांमध्ये चेन्नईने विजय प्राप्त केला आहे. तर बंगलोर संघाला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सामना सुरु होण्याआधी आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडला. आजच्या दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर आजच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.
दिल्ली कपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना दुपारी सुरु होणार आहे. १६ व्या हंगामात हे दोन्ही संघ दोन वेळेस समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही संघानी प्रत्येकी एक एक सामना जिंकला होता. यंदा दिल्लीच्या संघात रिषभ पंतचे कमबॅक झाले आहे. तर दिल्लीपुढे शिखर धावांचे आव्हान असणार आहे. आतापर्यंत दिल्ली आणि पंजाब हे संघ ३२ वेळेस समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये दोघांनी १६ – १६ वेळा विजय मिळविला आहे. आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. पीच रिपोर्टनुसार सामन्यात कमी धावसंख्या उभी राहू शकते.
दरम्यान, आतापर्यंत या दोन्ही संघाना एकदाही विजेतेपद पटकवता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात हे दोन्ही संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा उद्देशाने खेळतील यात शंका नाही. कमी धावसंख्या उभी राहिल्यास दोन्ही संघांच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला एवढी अडचण येऊ शकेल असे वाटत नाही.