आयपीएल सुरू होऊन आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. काहींना पराभवाने तर काहींना विजय प्राप्त करून या स्पर्धेची सुरुवात केली आहे. दरम्यान आज दोन नवीन कर्णधार असलेल्या युवा भारतीय खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियम हा सामना रंगणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघ खेळणार आहेत. चेन्नई आणि गुजरातने आपले पहिले सामने जिंकले आहेत.
चेन्नई संघाने बेंगलोरचा ६ विकेट्सनी पराभव केला आहे तर गुजरातने मुंबईचा ६ धावांनी पराभव केला आहे. खरेतर गुजरात बरोबर पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. खरेतर मुंबईच्या चाहत्यांना रोहित शर्मा कर्णधार नाहीये हे मनात बिंबवणे फार अवघड जाताना दिसत आहे. चेपॉक स्टेडियमबद्दल बोलायचे झाल्यास इथली धावपट्टी ही स्लो असते. स्पिन बॉलर्ससाठी हे मैदान फायदेशीर ठरते. इथला सरासरी स्कोअर हा १६० ते १७० च्या मध्ये आहे.
होम ग्राउंडवर सामना असल्याने चेन्नईचे पारडे जास्त वजनदार आहे. महेंद्रसिंह धोनी सारखा यशस्वी कर्णधार, फलंदाज यष्टीरक्षक चेन्नई संघाकडे आहे. याच मैदानावर चेन्नईने बंगलोरला पराभूत केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील गुजरात टायटन्स समोर चेन्नइचे तगडे आव्हान असणार आहे. हे मात्र नक्की. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण विजयी होते ते पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.