सध्या भारतात आयपीएलचा महासंग्राम सुरु आहे. २२ तारखेला या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय आणि विदेशी खेळाडू एकाच संघांमध्ये खेळत असतात. भारतीय चाहते सध्या आयपीएलचा आनंद लुटता दिसत आहेत. आयपीएलची रणधुमाळी सुरु असताना भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या कसोटी सामन्यात तीन नव्हे तर पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये एका डे-नाईट सामन्याचा समावेश देखील आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २२ नोहेंबरपासून सुरु होणार असून ३ जानेवारी रोजी ही मालिका संपणार आहे. या कसोटी सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तब्बल ३२ वर्षानंतर पाच सामन्यांची कसोटी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणार आहे. १९९१-१९९२ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका झाली होती. त्यानंतर नेहमी चार सामन्यांचीच मालिका होत असे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ डे-नाईट सामना देखील खेळणार आहे. यंदाच्या मालिकेत पिंक बॉलने देखील सामना खेळवला जाणार आहे. ६ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत डे- नाईट सामना खेळवला जाणार आहे. तर २२ ते २६ नोव्हेम्बर या कालावधीत पहिला सामना पर्थ या ठिकाणी खेळवला जाणार आहे.