आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु झाला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स हा संघ नवीन कर्णधारासह उतरला आहे. मात्र दोन सामन्यात मुंबई इंडियनसला पराभवाचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला अपेक्षित असे यश मिळताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का कधी फिट होणार याची काळजी संघाला आणि मॅनेजमेंटला आहे.
डिसेंबर जानेवारी महिन्यात साऊथ आफ्रिकेच्या मालिकेत सूर्यकुमार यादव हा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापपासून सूर्यकुमार यादव अनफिट आहे. क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलआधी तो फिट होईल असे सांगण्यात आले होते. मात्र दोन सामने झाले तरीही तो अजून फिट झालेला नाही. पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमारची उणीव मुंबईला जाणवली होती. गुजरातने ६ तर हैद्राबादने ३१ धावांनी मुंबईचा पराभव केला. सूर्यकुमार यादव असता तर दोन सामन्यांमध्ये चित्र कदाचित वेगळे असते. दरम्यान सूर्यकुमार सध्या बंगलोरच्या अकादमीमध्ये फिट होण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान येत्या एक दोन दिवसांमध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात खेळू शकतो.