आयपीएलचा हंगामाला सुरुवात झाली आहे. आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब सुपर किंग्ज हे दोन संघ समोरासमोर येणार आहेत. पंजाब संघाचे नेतृत्व शिखर धवन तर लखनौचे कर्णधारपद के. राहुल यांच्याकडे आहे. आज हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाबचा संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर, लखनौला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आज एक संघ दुसऱ्या विजयासाठी तर एक संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात खेळणार आहे.
लखनो सुपर जाएंट्स संघाला सामना जिंकायचा असल्यास त्यांना त्यांच्या फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात मुख्य फलंदाजांना लय सापडली नव्हती. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी आणि मार्क्स स्टोइनिस यांना मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. आजच्या मॅचमध्ये निकोलस पूरन आणि के.एल. राहुल यांच्यासह पंजाबच्या इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.
तर पंजाब संघाने एका सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय प्राप्त केला आहे. पंजाब संघाला आज विजय प्राप्त करताना नेट रनरेट सुधारण्याकडे देखील लक्ष दयावे लागणार आहे. त्यामुळे शिखर धवन कर्णधार असलेल्या पंजाब सुपर किंग्ज या संघाला आपल्या तिसऱ्या सामन्यात दुसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील तर लखनौ आपला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.