आयपीएलचा १७ वा हंगाम दणक्यात सुरु झाला आहे. आतापर्यंत १४ ते १५ सामने खेळून झाले आहेत. सर्वच सामने हे रंगतदार झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र आज म्हणजेच बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने मागच्या सामन्यात चेन्नईचा २० धावांनी पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये ७ व्या क्रमांकांवर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ पॉईंट्स टेबलमध्ये २ ऱ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत. खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांसाठी जास्त उपयुक्त आहे. यावर फलंदाज मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांचा कस लागणार आहे. आतापर्यंत केहलल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळविला आहे.
दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत- कर्णधार आणि विकेटकिपर , ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ॲनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
कोलकाता नाईट रायडर्स – फिल सॉल्ट विकेटकिपर, सुनील नारायन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर – कर्णधार, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा आणि अंगक्रिश रघुवंशी.