आयपीएलच्या हंगामात गुजरात टायटन्सच्या कर्णधारानंतर आता दिल्लीच्या कर्णधारला स्लो ओव्हर रेट मुळे दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना काल पार पडला. या सामन्यात दिल्लीला १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या सामन्यात स्लो ओव्हर रेट मुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याला दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र यातील खास गोष्ट म्हणजे एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा रिषभला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
पहिल्यांदा रिषभ पंतला १२ लाखांचा तर आता कालच्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिला १२ लाखांचा दंड चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ठोठावण्यात आला आहे. काल कोलकाताच्या दिल्लीला हरवल्यानंतर दिल्ली ९ व्या स्थानावर पोहोचली आहे. रिषभ पंतला ठोठावण्यात आलेल्या दंडाबाबत आयपीएलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
“दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला ३ एप्रिल रोजी विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान कमी ओव्हर-रेटच्या नियमांनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा होता आणि पंतला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याला देखील १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.