आज आयपीएलच्या स्पर्धेतील महत्वाचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात आजचा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवायचे असेल तर आजचा सामना दोन्ही संघाना जिंकणे आवश्यक आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा आमनेसामने येणार आहेत. आज मुंबई इंडियन्स आणि बंगलोरच्या संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आकडेवारीत मुंबईचा संघ सरस आहे. मात्र आरसीबीला हरविणे इतके सोप्पे देखील नाहीये.
मागील पाच सामन्यात आरसीबी आणि मुंबई आमनेसामने आले तेव्हा चार वेळा आरसीबीने मुंबईला पराभूत केले आहे. तर मुंबईला एकाच सामन्यात विजय निवत आला आहे. गतवर्षीच्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा पराभव केला होता. २००८ पासून सुरु झालेल्या सापरधेत मुंबई आणि बंगलोरचा संघ यांच्यात ३२ वेळा सामने झाले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने १८ वेळा तर बंगलोरने १४ वेळा विजय मिळवला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघाची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत सध्या तळागाळाला पोहोचले आहेत. आरसीबीला पाच सामन्यात १ तर मुंबईला चार सामन्यात १ विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. तसेच वानखेडेवर आजचा सामना असल्याने आणि आकडेवारी पहिली असता मुंबई इंडियन्सचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.