यंदाच्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अखेर विजय प्राप्त केला आहे. तसेच दिल्लीने लखनौ सुपर जायंट्सचा विजयी रथ देखील रोखला आहे. कालच्या विजयाने दिल्लीची गाडी थोड्या प्रमाणात रुळावर आल्याचे म्हटले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत दिल्लीने आपला दुसरा विजय साकार केला आहे. दिल्लीने लखनौला त्यांच्या होमग्राउंडवर पराभूत केले आहे. कर्णधार रिषभ पंत आणि नवख्या जेक फ्रेजर मैक्गर्क, पृथ्वी शॉ यांच्या खेळीमुळे दिल्लीला विजय प्राप्त करता आला.
दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा गोलंदाजी केली. दिल्लीने लखनौला १६७ धावांवर रोखले. लखनौ संघाने पहिल्यांदा फलंदाजी केल्यास ते जिंकू शकतात हा त्यांचा अंदाज या सामन्यात खोटा ठरला. रिषभ पंतने आज दिल्लीच्या टीममध्ये जेक फ्रेजर मैक्गर्क संधी दिली होती. जेक फ्रेजर मैक्गर्कनं ३५ बॉलमध्ये ५५ धाव केल्या. पृष्ठवी शॉ ने ३२ धावा केल्या. या भागीदारीनंतर रिषभ पंतने देखील चांगली साथ दिली. या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आपला दुसरा विजय मिळविला आहे.