आयपीएल स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब सुपर किंग्ज यांच्या सामना होणार आहे. हा सामना मुल्लानपूर येथील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागच्या राजस्थान रॉयल्सचा गुजरात विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभव झाला होता. या लढतीत अनुभवी ट्रेंट बोल्टऐवजी कुलदीप सेन व आवेश खान या गोलंदाजांवर भरवसा ठेवणाऱ्या संजू सॅमसनच्या नेतृत्वावर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती .
राजस्थान रॉयल्सने सलग चार सामने जिंकत गुणतालिकेत अव्व्ल स्थान पटकावले आहे. मात्र त्यांना कालच्या गुजरातच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. आज राजस्थान पंजाबच्या संघाशी दोन हात करणार आहे. यंदाच्या स्पर्धेत पंजाबचा संघ जय-पराजय या मार्गातून प्रवास करत आहे. पंजाब सुपर किंग्जला देखील आपला खेळ उंचावण्याची गरज आहे. कर्णधार शिखर धवन, शशांक सिंग आणि अन्य फलंदाजानी म्हणाव्या तितक्या दहाव्या केलेल्या नाहीत.
आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. जास्त करून पंजाब सुपर किंग्ज संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. तसेच कर्णधार शिखर धवनला अजूनही कर्णधाराला साजेशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तर आज कर्णधार संजू सॅमसन आपल्या संघाची खंडित झालेली विजयाची मार्गिका पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे.