काल आयपीएलच्या स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात सामने पार पडला. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने चेन्नईवर ८ विकेट्सनी विजय मिळविला आहे. दरम्यान या सामन्यात के. एल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या खेळीपेक्षा चर्चा रंगली आहे ती म्हणजे रवींद्र जडेजाने पकडलेल्या कॅचची. कालच्या सामन्यात जडेजाने चेन्नई संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. चेन्नई हरली असली तरी देखील जडेजाने पकडलेल्या कॅचची चर्चा सर्वत्र आहे.
रवींद्र जडेजाने फलंदाजी करत असताना शानदार अर्धशतक जोडले आणि क्षेत्ररक्षण करत असताना शानदार झेल देखील पकडला. दरम्यान जडेजाने पकडलेला झेल पाहून कर्णधार ऋतुराज गायकवाड, के. एल राहुल आणि मथीशा पॅथीराना यासह लखनौ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जॉन्टी रॉड्स यांनी देखील उभे राहून जडेजाची कौतुक केले.
रवींद्र जडेजाने लखनौचा कर्णधार के.एल. राहुलचा शानदार झेल पकडला. राहुल १८ व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्याने चेंडू पॉईंटच्या दिशेने मारला.राहुलने मारलेला चेंडू चौकार जाईल असे सर्वाना वाटले. मात्र जडेजाने अत्यंत चपळाईने तो चेंडू पकडला आणि राहुल बाद झाला. यावेळी त्याने पकडलेला झेल पाहून सगळेच चकित झाले होते.