आयपीलच्या यंदाच्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. सर्व संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बंगलोरच्या संघापेक्षा गुजरातच्या संघाला प्लेऑफ मध्ये जाण्याची संधी जास्त आहे. तरीही दोन्ही संघ विजयासाठीच मैदानात उतरणार हे नक्की आहे. त्यामुळे आजचा सामना हा अत्यंत रोमहर्षक आणि रंगतदार होण्याची शक्यता आहे.
फाफ डू प्लेसिस हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा तर शुभमन गिल हा गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आहे. गुजरातला यंदाच्या स्पर्धेत सातत्य राखण्यात यश आलेले नाही. गुजरात टायटन्स आपल्या १० सामन्यांपैकी केवळ ४ च सामने जिंकले आहेत. त्यांना सहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. गुजरात टायटन्सला गोलदांजीत देखील फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने देखील १० सामन्यात केवळ ३ विजय प्राप्त केले आहेत. त्यामुळे बाकीचे सामने जिकून ते आपल्या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.