आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपले आहे. त्यांनी १२ मधील केवळ ४ च सामने जिंकले आहेत. आजचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स या मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा सामना सुरु होईल. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. दरम्यान आज केकेआर प्लेऑफमध्ये जाणार की मुंबई इंडियन्स पराभवाचा बदल घेणार आहे हे बघावे लागणार आहे.
कोलकाताच्या मुंबईला वानखेडे स्टेडियमवर पराभूत करून १२ वर्षांचा मुंबईचा वानखेडेवर जिंकण्याचा इतिहास मोडीत काढला होता. आज मुंबईला पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. तर गेल्या तीन वर्षांमध्ये कोलकाताच्या संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.