आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्पातल्या मतदानाला सुरवात झाली आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह एकूण 96 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर तेलंगणमधील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 17 जागा, आंध्र प्रदेशमधील 25, उत्तर प्रदेशातील 13, बिहारमधील 5, झारखंडच्या 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओदिशाच्या चार, पश्चिम बंगालच्या आठ आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेसाठी आज मतदान मतदान होत आहे. तसेच या टप्प्यात आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागा आणि ओदिशाच्या 28 विधानसभा जागांसाठी मतदान संपन्न होणार आहे.
ज्युनियर एनटीआर आणि अल्लू अर्जुन हे दोन तेलुगू अभिनेते आज आपापल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळी लवकर पोहोचले. अल्लू अर्जुन एकटा होता. तर ज्युनियर एनटीआर सोबत त्याची पत्नी लक्ष्मी प्राणथी आणि आई शालिनी नंदामुरी होत्या. हैदराबादमधील जुबली हिल्स येथील मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या दोन अभिनेत्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेता ज्युनियर एनटीआर, याने त्याच्या कुटुंबासह, हैदराबादच्या जुबली हिल्समधील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यानंतर त्याने त्याने सर्वाना मतदान करण्याचे आवाहन केले. “प्रत्येकाने त्यांच्या मताचा अधिकार वापरला पाहिजे. मला वाटते की हा एक चांगला संदेश आहे जो आपण येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.”