आयपीएलच्या १७ हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. आज आयपीएल स्पर्धेच्या साखळी सामन्यांमधील शेवटचा सामना असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आजचा सामना होणार आहे. याआधीच आयपीएलमधील तीन संघ हे प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई इंडियन्सचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे. लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान देखील संपले आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करताना दिसतील.
आजच्या सामन्यात काहीसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र आजच्या सामन्यात तरी कर्णधार हार्दिक पंड्या अर्जुन तेंडुलकरला संधी देणार हा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. अर्जुन तेंडुलकरला आजवर १३ पैकी एकही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. आज कदाचित त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगतदार होण्याची शक्यता आहे.