अभिनेता हृतिक रोशनने सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जाऊन नुसते मतदानच केले नाही तर सर्वांना सुजाण मतदार बनण्याचे आवाहनही केले आहे.
मुंबईतील एका मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर, ‘फायटर’ स्टारने प्रसारमाध्यमांशी थोडक्यात संवाद साधला आणि मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी प्रत्येकाने उमेदवारांबद्दल योग्य संशोधन करणे महत्त्वाचे आहे मतदान करण्यापूर्वी उमेदवारांचा अभ्यास करा, तुम्ही कशाला मतदान करत आहात हे जाणून घ्या, असे तो माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाला आहे.
हृतिक त्याचे वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन, आई पिंकी रोशन आणि बहिण सुनैनासोबत मतदान केंद्रावर पोहोचला.त्याने इन्स्टाग्रामवर देखील मतदान केंद्रावरील फॅम-जाम छायाचित्र शेअर केले आहे.
आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आणि ते संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. शेवटच्या वेळेपर्यंत रांगेत उभे असलेल्यांना मतदान करण्याची परवानगी आहे.निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 4.69 कोटी पुरुष, 4.26 कोटी महिला आणि 5409 तृतीयपंथी मतदारांसह 8.95 कोटी मतदार पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानात 695 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.