आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. तर आरसीबीचं या पराभवासह या हंगामातील आव्हान इथेच संपुष्टात आलं. आरसीबीच्या या प्रवासासह दिग्गज विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक यानेही आपला आयपीएलचा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. सामन्यांनंतर दिनेश कार्तिकने सहकारी आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अखेरचं हस्तांदोलन केलं. तसेच उपस्थित चाहत्यांचं हात दाखवून आभार मानले. यावेळेस दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. कार्तिकच्या या निर्णयाला आता कुठे 2 दिवस होत नाहीत, तोवर आयसीसीने दिनेश कार्तिककडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.
दिग्गज विकेटकीपर दिनेश कार्तिकने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपला आयपीएलचा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.आयपीएलच्या १७ व्या मोसमातल्या सामन्यांनंतर दिनेश कार्तिकने सहकारी आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना अखेरचे हस्तांदोलन केले. यावेळेस दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. अशा प्रकारे दिनेश कार्तिकच्या जवळपास २० वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट झाला.
कार्तिकच्या या निर्णयाला आता कुठे 2 दिवस होत नाहीत, तोवर आयसीसीने दिनेश कार्तिककडे मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे समोर आले आहे.2 जूनपासून अमेरिकेत टी 20 वर्ल्ड कप 2024 सुरु होत आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी असणार आहेत. आयसीसीकडूनही स्पर्धेची जवळपास तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. आयसीसीने आता टी 20 वर्ल्ड कपसाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज समालोचकांसह आता दिनेश कार्तिकही दिसणार आहे. या यादीत प्रमुख समालोचकांसह दिग्गज क्रिकेटपटूही समालोचन करताना दिसणार आहेत. . टी 20 वर्ल्ड कप विजेते महिला आणि पुरुष खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दिनेश कार्तिक, याच्यासह कार्ल्स ब्रेथवेट, स्टीव्हन स्मिथ, एरॉन फिंच, एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट, सैमुअल बद्री आणि लिसा स्थळेकर यांचा समावेश आहे