टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सध्या रंगतदार होताना दिसत आहे. आज अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर गेली आहे. अत्यंत चुरशीचा सामन्यात अफगाणिस्तानने ८ धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे. आता २७ तारखेला अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनल खेळणार आहे.
कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया हरल्याने त्यांना सेमीफायनलमध्ये जायला मिळणार की नाही याचा फैसला आजच्या सामन्यावर अवलंबून होता. अफगाणिस्तान पराभूत झाली असती तर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहोचली असती. मात्र आता अफगाणिस्तानच्या विजयाने सर्वच समीकरणे बदलली आहेत. कर्णधार रशीद खानने ४ विकेट्स घेत सामन्यात रंगत आणली.
बांग्लादेशकडून लिट्ल दास हा शेवट्पर्यंत खिंड लढवत होता. मात्र त्याच्या खेळीचा फायदा बांगलादेशला झाला नाही. अफगाणिस्तानने केवळ ११५ धावा केल्या होत्या. त्यामुळे कमी धावसंख्या डिफेंड करणे तसे महत्वाच्या सामन्यात होते. मात्र अफगाणिस्तानच्या संघाने हे आव्हान सहज पेलले. तसेच चुरशीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.