Vidhanparishad Electon : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी पार पडला. ११ जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांना पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले.
नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे (भाजप), योगेश टिळेकर (भाजप), अमित गोरखे (भाजप), परिणय फुके (भाजप), सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी (शिंदे शिवसेना), कृपाल तुमाने (शिंदे शिवसेना), शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), राजेश विटेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उबाठा) या 11 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले होते. तर महाविकास आघाडीचे ३ निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शेवटच्या टप्पात ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात लढत झाली. कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून रिहिले होते. अखेर, मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला आणि जयंत पाटलांना पराभव पत्कारावा लागला. याच विजयी आमदारांनी आज शपथ घेतली आहे.
शपथ घेणाऱ्या ११ आमदारांची नावे
1. पंकजा मुंडे (भाजप)
2. सदाशिव रामचंद्र खोत (भाजप)
3. परिणय रमेश फुके (भाजप)
4. भावना पुंडलीकराव गवळी, (शिंदे शिवसेना)
5. कृपाल हिराबाई बालाजी तुमाने, (शिंदे शिवसेना)
6. योगेश कुंडलीक टिळेकर (भाजप)
7. प्रज्ञा राजीव सातव, ( काँग्रेस)
8. शिवाजीराव यशवंत गर्जे, (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
9. अमित गणपत गोरखे, (भाजप)
10. मिलिंद केशव नार्वेकर, (उद्धव ठाकरे पक्ष)
11. राजेश उत्तमराव विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)