Nashik News : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या भाषणावेळी हनुमान चालीसा सुरू झाल्याचे दिसत आहे.
झालं असं छगन भुजबळ यांचे भाषण सुरु असताना हुनमान चालीसा सुरू झाली. त्यानंतर भुजबळ यांनी पोलिस इन्सपेक्टर यांचे माईकवरच नाव पुकारत आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर हनुमान चालीसाचा आवाज कमी झाला. त्यावेळी भुजबळ यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओ?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ एका कार्यक्रमात संबोधित करत होते, त्यावेळी शेजारी असलेल्या एका मंदिरात हनुमान चालीसा सुरू झाली. तेव्हा भुजबळ यांनी आवाज कमी करण्याची विनंती केली. ते म्हणाले, मी सुद्धा बजरंग बलीचा भक्त आहे बाबा, पण आवाजामुळे भाषण कसे करणार? पोलिस इन्सपेक्टर तेवढी दखल घ्या.
दरम्यान भुजबळ यांनी त्यांचे भाषण संपल्यानंतर हनुमान चालीसाचा आवाज कमी केल्याबद्दल मंदिर प्रशासनाचे आभार मानल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.