RCB Virat Kohali: 27 एप्रिल रोजी आरसीबी विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना पार पडला. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्वाचा होता. कालच्या सामन्यात बंगळुरूने टॉस जिंकत प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीकडून पोरेल आणि डू प्लेसी यांनी डावाची सुरूवात केली होती. पहिल्यांदा फलंदाजी करत दिल्लीने आरसीबीसमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले होते.
दिल्लीने दिलेल्या 163 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरूवात फारशी चांगली झालेली दिसली नाही. विराट कोहली बरोबर सलामीला आलेल्या जेकब बेथेल हा 12 धावा काढून बाद झाला तर देवदत्त पाडिक्कल शुन्यावर बाद झाला. तर दुसरीकडे विराट कोहली सावध खेळी खेळताना दिसला. विराट कोहलीला कृणाल पंड्याने चांगली साथ देत अर्धशतक पुर्ण केले. कृणाल पांड्याने ७३ धावा केल्या तर विराट कोहलीने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली ५१ धावा करून बाद झाला होता.
आरसीबीसाठी हा विजय महत्वपूर्ण ठरला आहे . कारण आरसीबीचा हा सातवा विजय असल्याने आरसीबीने गुजरात टायटन्सला मागे टाकत 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आरसीबीला आता प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी केवळ एक सामना जिंकावा लागणार आहे.
दरम्यान, आरसीबीने हा सामना जिंकून एकाप्रकारे पराभवाची परतफेड केली आहे. कारण २४ मार्च रोजी झालेल्या दिल्ली विरूद्ध आरसीबी सामन्यात दिल्लीने आरसीबीला 6 विकेट्सने पराभूत केले होते. आता काल आरसीबीकडून पराभव झाल्यानंतर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला आहे.