आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मनसे भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा सुरु आहे. मात्र त्या आधी भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर ते एकत्रितपणे अमित शहांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले होते. दरम्यान मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होण्याची शक्यता असून, मनसे महायुतीमध्ये सामील होण्याच्या चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहेत. असे झाल्यास राज्यात महायुतीला लोकसभा आणि विधानसभेला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे राज्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आता दिल्लीला रवाना झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने कदाचित मनसे-भाजपा यांच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज दिल्लीत शहांच्या उपस्थितीमध्ये महाययुतीच्या जागावाटपावर चर्चा बैठक होणार आहे. राज ठाकरेंनी शहांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. याआधीही फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये अनेक बैठक व भेटी झाल्याचे देखील समजते आहे. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महायुतीचे जागावाटपावर आज दिल्लीत बैठक
महायुतीमध्ये ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आता घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा होणार असून, जागांवर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. काही जागांवरून महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार याबाबत अजूनही साशंकता आहे. नाराजी असल्याचे जागावाटप निश्चित झालेले नाही. मात्र आता लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे.