देशात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता देखील लागू केली आहे. तारखा जाहीर झाल्यानंतर देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच सर्व पक्ष आपापली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्यात देखील महायुती आणि मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काही जागांवरून महायुती आणि मविआमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अजित पवार शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरुद्ध उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने आढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. आता शिवाजीराव आढळराव पाटील हे सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या आढळराव पाटलांसमोर खासदार अमोल कोल्हेंचे आव्हान असणार आहे. महायतिच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्य्यात आली आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण होईल असे महायुतीतील नेत्यांचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.