Mumbai (Girgaon) : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली २३ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौकात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला.
या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी “एक है तो सेफ है”, “सनातन हिंदू एकता जिंदाबाद”, “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणांचे फलक हातात घेतले होते. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या वेळी भाषण करताना सांगितले की, “जम्मू-काश्मीरमध्ये शाहिद झालेल्या लोकांचा काहीही दोष नसताना केवळ ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मारण्यात आले. तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी कसाबला इथे जिवंत पकडताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यामुळे हा चौक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
ते पुढे म्हणाले, “या घटनेत पाकिस्तानचा हात आहे. त्यांना कितीही समजावून सांगितले तरी काही होणार नाही. कधीतरी अंतिम युद्ध होईल.” मंत्री लोढा यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “आपण फक्त दिवे लावून आणि भाषण करून थांबायचे नाही. तर मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून काढून त्यांचा बहिष्कार करायला हवा. ते जिथे कुठे असतील तिथून त्यांना शोधून काढा. जीवनात देशासाठी काहीतरी करायचे असल्यास एक महिन्यात एक रोहिंग्या किंवा बांगलादेशी शोधून पोलिसात तक्रार दाखल करावी. असे केल्यास मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी बंद होईल.”
पहलगाम, काश्मीर येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गिरगांव चौपाटी परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे चौक येथे सर्वजण एकत्र जमलो.
हा हल्ला देशाच्या एकात्मतेवर मोठा आघात आहे, नवीन भारत याला नक्कीच प्रत्युत्तर देईल.… pic.twitter.com/0E8lBIfM2X
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 23, 2025
पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ हिंसाचार नव्हता, तर भारताच्या एकात्मतेवर आणि हिंदू समाजाच्या सुरक्षेवर केलेला थेट हल्ला होता. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईत हा निषेध मोर्चा काढला होता.या निषेध मोर्चात मंत्री लोढा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.