अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे.या दरम्यान त्यांनी अवैध प्रवाशांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे, ज्यामुळे भारतातून अवैधरित्या अमेरिकेत गेलेल्या हजारो भारतीयांचे भविष्य धोक्यात आले आहे अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
अमिरेकेत राहणारे सुमारे १८ हजार भारतीयांना अमेरिका परत भारतात पाठवणार आहे. यावर आता भारत सरकारही ट्रम्प प्रशासनाला मदत करण्यास तयार आहे. अशी भूमिका घेत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एस जयशंकर यांनी म्हंटले आहे की, आमचे सरकार कागदपत्र नसलेल्या भारतीयांना त्यांच्या देशात कायदेशीर परत करण्यासाठी सदैव तयार आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत, जिथे त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधित्व केलें. त्यांनी बुधवारी वॉशिंगटन डीसी येथे पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “भारतीयांची प्रतिभा जगाला दिसावी अशी आमची इच्छा आहे. प्रतिभावान भारतीयांनी जागतिक व्यासपीठावर त्यांची प्रतिभा दाखवावी अशी आमची इच्छा आहे, परंतु आमचा अवैध स्थलांतराला विरोध आहे. जयशंकर म्हणाले, “आमचे कोणीही नागरिक बेकायदेशीरपणे तेथे असतील आणि ते आमचे नागरिक असल्याची आम्हाला खात्री असेल, तर आम्ही त्यांच्या कायदेशीर भारतात परतण्यासाठी सदैव तयार आहोत.”
अमेरिकेमध्ये सुमारे 18 हजार भारतीय आहेत ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत किंवा त्यांचा व्हिसा संपला आहे.आम्हाला या विषयावर अमेरिकेसोबत एकत्र काम करायचे आहे. मात्र, त्याला अमेरिकेने व्हिसा देण्यास विलंब केल्याचा मुद्दाही यावेळी जयशंकर यांनी उपस्थित केला. जयशंकर म्हणाले की, एखाद्या देशाने एखाद्या व्यक्तीला व्हिसा देण्यासाठी 400 दिवसांपेक्षा जास्त वेळ थांबवले तर ते योग्य नाही.
अमेरिकन प्रशासनाने तयार केलेल्या कागदपत्रांनुसार अमेरिकेत सुमारे 18 हजार भारतीय आहेत ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्यासाठी पुरेशी वैध कागदपत्रे नाहीत. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंट (ICE) च्या डेटानुसार, नोव्हेंबर 2024 पर्यंत, 20,407 लोक होते ज्यांचे वर्णन यूएस ‘अदस्तलेखित’ किंवा ‘अपूर्णपणे दस्तऐवजीकरण केलेले’ म्हणून करण्यात येत आहे.