Mulund: गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या हे मुंबईतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यांनी पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत. त्यानंतर आता मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर मुंबईतील मुलुंड परिसर आता ‘भोंगा मुक्त’ झाला आहे. तिथल्या सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे मुलुंड पोलिसांनी हटवले आहेत. या कारवाईची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी ट्वीट करून दिलीआहे. त्यांनी मुलुंड पोलीस स्टेशनचे अधिकारी अजय जोशी आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.
मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार, ध्वनीप्रदूषणाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी सुरुवातीला समज द्यावी, पुन्हा तक्रार झाल्यास ५,००० रुपये दंड आकारावा आणि तरीही नियम मोडले तर भोंगे जप्त करावेत, असे स्पष्ट सांगितले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील काही मशिदींमधून येणाऱ्या भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. यामुळे परिसरात शांतता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांना अनधिकृत मशिदी आणि बेकायदेशीर लाऊडस्पीकर (भोंगे) विरोधात कारवाईची मागणी केल्याबद्दल युसूफ उमर अन्सारी या व्यक्तीने सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण तरीही सोमय्या यांनी आपली ही मोहीम सुरूच ठेवली आणि धमकी देणाऱ्या अन्सारीच्या विरोधात ईशान्य मुंबईचे भाजप अध्यक्ष दीपक दळवी यांच्याकडे तक्रार केली. मग दळवी यांनी मुलुंड पोलिस आयुक्तांना पत्र लिहून अन्सारीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
खरतर किरीट सोमय्या यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलुंड परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात प्रभावी कारवाई झाली. यामुळे फक्त कायद्याची अंमलबजावणीच झाली नाही, तर ध्वनीप्रदूषणाविरोधात समाजात जागरूकताही वाढली. धमकी मिळाल्यानंतरही सोमय्यांनी आपली मोहीम न थांबवता पुढे सुरू ठेवली, यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि योग्य ती कारवाई झाली. यापुढेही अशा प्रकरणांमध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, जेणेकरून सार्वजनिक शांतता आणि नियमांची शिस्त अबाधित राहील.
*"भोंगा मुक्त मुलुंड!"*
मुलुंड मधील सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरण्यात आले आहे.
मुलुंड पोलिसांचे अभिनंदन!
लवकरच आपण भोंगा मुक्त मुंबई, भोंगा मुक्त महाराष्ट्र करुया!
मशिदींवर भोंग्यांचा गोंगाट चालणार नाही! pic.twitter.com/8d38i6e4AO
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 24, 2025