Pune Prasad Baba Case: आजचे युग हे विज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत आहे. एवढेच नाहीतर मानवाने अंतराळात झेप घेतली आहे. परंतु तरीही आजच्या प्रगत युगात अनेक लोक भोंदू बाबांच्या, मांत्रिकांच्या जाळ्यात अडकून स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. आजपर्यंत भोंदू बाबांनी फसवल्याचे कित्येक प्रकार उघडकीस आलेत तरीही आजही लोक डोळे झाकून कोणत्याही भोंदू बाबावरती विश्वास ठेवत आहेत. नुकतेच पुण्यातील अशाच एका भोंदू बाबाचे कारनामे उघडकीस आले आहेत. या बाबाचे नाव प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार असे आहे. हा प्रसाद बाबा मोबाईल मधील छुप्या ॲपच्या माध्यमातून भक्तांवर नजर ठेवत होता. नुकतीच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमका हा प्रसाद बाबा आहे तरी कोण, तो लोकांना कसा फसवत होता, याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखातून घेऊयात.
प्रसाद बाबा नेमका आहे तरी कोण आणि तो बाबा कसा बनला: (Who exactly is Prasad Baba and how did he become a Baba?)
प्रसाद तामदार याचे वडील हे भीमराव तामदार हे काही वर्षांपूर्वी मांडवाचा व्यावसाय करायचे. परंतु अचानकच या भीमराव तामदारने आपल्यासा साक्षात्कार झाल्याचा दावा केला आणि त्यानंतर या भीमराव तामदारने पुण्यातील सूस या भागामध्ये ब्रम्हांडनायक या मठाची स्थापना केली. हळूहळू हा मठ आसपासच्या लोकांमध्ये प्रसिद्ध झाला त्यामुळे या मठात पुरूष आणि महिला भक्तांची संख्या हळूहळू वाढू लागली. या मठाच्या महिल्या मजल्यावरत तामदार कुटुंब राहयाचे. त्याच्या वरती जे काही मजले होते. २०२२ पर्यंत प्रसाद तामदार याने सीएचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनतर त्याने बाबा बनण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने दाढीही वाढवली आणि तो स्वत: ची ओळख प्रसाद बाबा म्हणून करून घेऊ लागला. या प्रसाद तामदराने त्याच्या मठात हक्काचे माहेरघर नावाचे एक कक्ष सुरू केला होता. हक्काचे माहेरघर हे नाव त्याने यासाठी दिले होते की, तो भक्तांना असा भासवून द्यायचा की जणू तो भक्तांचा वडिल आहोत.
प्रसाद तामदाराने इंस्टाग्रामवरतीही अकाऊंट काढले होते. त्याच्या इंस्टाग्राम पेजवर दीड लाखाहून अधिक फोलोवर्स आहेत. त्याच्या अकाऊंटवरती तो पुरूष भक्तांना अंघोळ घालतानाचे व्हिडीओ आहेत. तसेच काही महिला भक्तांसोबत नाचताना आणि महिला भक्तांची ओटी भरतानाचे काही व्हिडीओ आहेत. त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टच्या खाली ज्या कमेंट आल्या आहे ते अतिशय सकारात्मक दिसत आहेत.
प्रसाद बाबाचे कारनामे: (The exploits of Prasad Baba)
हा भोंदू प्रसाद बाबा त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच दावा करत भक्तांना गैरप्रकार करायला लावत असल्याचे समोर आले आहे. प्रसाद बाबा अगोदर भक्तांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर भक्ताला तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा, त्यानंतबर भक्त घाबरला की, त्याला या संकटातून वाचवण्याचे वचन द्यायचा. त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा.
एवढेच नाहीतर प्रसाद बाबा त्याच्या मठात आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा. फोन मागायचे कारण सांगायाचा की, तुम्हाला ग्रहदोष असल्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावे लागेल, मात्र एकदा का भक्ताचा मोबाईल हातात आला की, कंपास अॅप डाउनलोड करण्यासोबतच तो ‘एअर ड्रॉइड कीड’ हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. ‘एअर ड्रॉइड कीड’ हे अॅप पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल एक्टिव्हीटीवर नजर ठेवता यावी यासाठी बनवण्यात आला आहे. पंरतु हा प्रसाद बाबा या अॅपचा वापर भक्तांना फसवण्यासाठी करायचा. ‘एअर ड्रॉइड कीड’ हे अॅप भक्तांत्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाला की, त्या मोबाईलचा संपूर्ण एक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेरातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. भक्ताने कधी कोणत्या रंगाचे कपडे घातले होते,भक्त कुठे कुठे गेलो होतो याची माहिती तो या अॅपद्वारे मिळवायचा आणि भक्त आल्यावर त्यांना तो सांगायचा. आपल्या बदद्लची खरी माहिती दिल्याने भक्तांना हा एक दिव्य साक्षात्कार वाटायचा त्यामुळे भक्तांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच वाढत जायचा.
तसेच प्रसाद बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग दोन दिवस केवळ तीन तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर त्या भक्ताला या मठात बोलावून पुढच्या काहीतरी क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगायचा. सलग दोन दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेला की, प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळे सुरु करायचा आणि तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे, असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पडायचा. विशेष म्हणजे हा भोंदू बाब समलैंगिक होता.
– हा भोंदू बाबा गरज पडल्यास भक्तांना गुंगीचे औषध देऊन अश्लिल कृत्य करायचा अशीही माहिती समोर आली आहे.
-एकदा एका भक्ताला मैत्रिणीशी संबंध प्रस्थापित करताना ‘हिडन अॅप’ सुरू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर या भक्ताने असे करण्यान मनाई केली. तर या ढोंगी बाबाने भक्ताला कागदावर तारीख लिहून त्या दिवशी त्याचा मृत्यू होईल, अशी धमकी दिली असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी नुकतेच या प्रसाद बाबाकडून तीन मोबाइल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड आणि निद्रानाशावरील गोळ्यांचे पाकीट जप्त केले आहे. भक्तांचे खासगी क्षण ‘हिडन अॅप’द्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती समोर आली आहे. आता हा लॅपटॉप हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
प्रसाद बाबाचे बिंग कसे फुटले: (How Prasad Baba’s Bing exploded)
एके दिवशी या भोंदू बाबाच्या तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होत असल्याने त्याने तो दुरुस्तीसाठी एका मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला. तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या या मित्राने लॅपटॉपच्या सहाय्याने त्या भक्ताचा मोबाईल तपासला असता त्याला एक संशयास्पद एयरड्रॉइड किड्स हे गोपनीय अॅप सापडले. त्यावरून त्याला अंदाज आला की, हा मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत आहे. त्याने ही माहिती त्या भक्ताला दिली. तेव्हा त्या भक्ताला आठवले की, आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. यानंतर या भक्ताने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, इतर काही भक्तांच्या मोबाईलमध्येही तेच अॅप असल्याचे समोर आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे अनेक भक्तांच्या लक्षात आले या भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाबही विचारला. त्यावेळी बाबाचे बिंग फुटले आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुण भक्ताने फोन करून थेट पोलिसांना ही माहिती दिली आणि बाबाचे सगळे कारनामे उघड झाले.
प्रसाद बाबाच्या पोलिस कोठडीत वाढ: (Prasad Baba’s police custody extended)
प्रसाद बाबाने पुरुष, महिला आणि लहान मुलांचीही फसवणूक केल्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती भक्तांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. विशेष म्हणजे त्याने फसवणूकीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशांतून मालमत्ता खरेदी केली आहे का, आणि त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे याचा तपासही पोलिस करत आहेत. त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी या ढोंगी बाबाच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मंगळवारी( १ जुलै रोजी) मान्य करत ढोंगी बाबाच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे आता तपासात आणखी काय समोर येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पोलिसांनी या बाबासोबत गैरवर्तन झालेल्या इतर पीडितांनी निर्भीडपणे पुढे यावे आणि तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.
अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन:
पोलिस आणि सामाजिक संस्थांनी धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूक आणि शोषणाच्या घटनांविषयी जागरूक राहण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. कुठल्याही स्वयंघोषित बाबांकडून वैयक्तिक माहिती मागितली गेल्यास किंवा संशयास्पद वर्तन झाल्यास, नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असेही पोलिसांनी म्हटले आहे.
खरेतर प्रसाद बाबा सारखे अनेक ढोंगी बाबा आहेत. आता आपण प्रसाद बाबा सारख्या इतर काही भोंदू बाबांची माहिती घेऊयात:
2024 मध्ये समोर आलेले कल्याणमधील भोंदू बाबाचे कारनामे: (The exploits of the fraudster from Kalyan that came to light in 2024)
कल्याणमधील एका तरुणीला कौटुंबिक त्रास सुरू होता. कौटुंबिक त्रास दूर होण्यासाठी या तरुणीला आंबिवली येथील एका बाबाचा पत्ता मिळाला. आंबिवली येथील हा बाबा कौटुंबिक समस्या दूर करून घरात सुख शांती आणतो अशी माहिती या तरुणीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पीडित तरुणी नातेवाईकांना घेऊन आंबिवली येथील अरविंद जाधव या बाबाकडे गेली होती. तिथे पोहचताच या बाबाने त्या पिडीत तरूणीला सांगितले की,
तुझा त्रास दूर होईल मात्र तुझी नजर उतरावी लागेल आणि त्यासाठी तुला काही वेळ इथेच थांबावे लागेल. मात्र तुझ्या घरच्यांना बाहेर जाऊ दे. तिच्या घरचे बाहेर गेल्यानंतर या भोंदू बाबाने नजर उतरवण्याच्या कारणाने या तरुणीच्या शरीरावर हात लावण्यास सुरुवात केली. तरुणीला हा स्पर्श वासनेचा लक्षात आल्यानंतर तरुणीने बाबाला हात लावण्यास मनाई केली. तसेच झालेला प्रकार सर्वांना सांगणार असल्याचे सांगितले. त्यावेळेस भोंदू बाबाने या तरुणीला धमकी देत या प्रकाराची माहिती कोणाला दिली तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. यानंतर तरुणीने कुटुंबासोबत खडकपाडा पोलीस स्टेशन पोलिसात तक्रार नोंदवली होती.
एप्रिल 2025 मध्ये कोल्हापूरमधून उघडकीस आलेला प्रकार: (Type revealed from Kolhapur in April 2025)
ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील. या प्रकरणातील भोंदू बाबाचे नाव राजाराम भिकाजी तावडे असे आहे. या भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणीत्याच्यासोबत मनोज सावंत आणि सुप्रिया हिम्मत पोवारत यांना भोंदू बाबाला मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. अटक केलेल्या सुप्रिया पोवारची पीडिताच्या आईशी ओळख झाली होती. त्यानंतर सुप्रिया हिने पिडीतेला या भोंदू बाबाच्या इथे काम दिले होते. या तिन्ही आरोपींनी पिडीतेला भविष्याची आमिषे दाखवून अघोरी पूजा करण्यास बसवले होते. त्यानंतर चार महिने हा भोंदू बाबा पिडतेवर अत्याचार करत होता. त्यानंतर या पिडितेने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पिडीतेच्या आईने ह्युमन राईट संस्थेकडे दाद मागितली होती. त्यानंतर पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली होती.
पैशांचा पाऊस पडेल असे आमिष दाखवून तीन मुलींवरती अत्याचार
ही घटना आहे नागपूरातील. कंदील बाबा नावाने प्रसिद्ध असलेल्या अब्दुल कुरैशी याने पैशांचे आमिष दाखवत तीन मुलींवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना एप्रिल २०२५ मध्ये समोर आली होती. तुमच्याकडे पैशाचा पाऊस पाडणे शक्य आहे. त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, आणि या पूजेसाठी तीन अल्पवयीन मुली लागतील असे त्याने सांगितले. गांभीर्याची बाब म्हणजे त्याने असेही सांगितले की, तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्नावस्थेत बसावे लागेल. त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे यांनी तीन अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली आणि गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजनही करण्यात आले. या पूजेच्या ठिकाणी त्या भोंदू बाबाने तीनही अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केले. यासाठी त्याने या मुलींना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले होते.
पतीचे दारू सोडून देतो म्हणत विवाहितेवर प्रसिद्ध बाबाचा अत्याचार:
गरम तव्यावर बसल्याने २०२४ मध्ये अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील एक माणूस गुरूबाबा म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरतीही व्हायरल झाला होता. त्याचे नाव प्रसिद्ध झाल्याने मध्य प्रदेशमधील एक महिला आपल्या पतीने व्यसन सोडावे यासाठी या बाबाकडे आली. या गुरूबाबाने सांगितले की, तुझ्या पतीचे व्यसन सोडून देतो पण त्यासाठी तुला काही दिवस माझ्या आश्रमात राहून पूजापाठ करावी लागेल. त्यानंतर ही महिला आपल्या पतीचे व्यसन सुटेल या हेतून आश्रमात राहू लागली. या दरम्यान या भोंदू बाबाने तिच्यावरती अत्याचार केले ते तिने सहनही केले. त्यानंतर त्या भोंदू बाबाने तिच्यासोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये काढला. त्यानंतर या महिलेने ही घटना आपल्या नातेवाईकांना सांगितली आणि पोलिसातही तक्रार दिली. त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
दरम्यान अशा अशा कित्येक घटना आहेत ज्यामध्ये अशा भोंदू बाबांनी पूजा, पाठ करण्याच्या कारणाने, दिव्य शक्ती असल्याचा दावा करून, सगळ्या समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत, महिलांवरती अत्याचार केले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट ही की, अशा कित्येक घटना समोर येऊनही आजही समाजातील लोक अशा घटनांना बळी पडत आहेत. आजकाल तर हे ढोंगी बाबा सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. सोशल मीडियावर आपला चमत्कार दाखवतात आणि ते पाहून लोक या असल्या ढोंगी बाबांच्या आहारी जातात. काही वेबसाईट, यूट्यूब, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा बाबांचे कथित चमत्कार, भविष्यवाणी, अघोरी उपाय मोठ्या हौसेने दाखवले जातात. यामुळे सामान्य माणसाच्या मनात काहीतरी शक्ती असेल’ हा गैरसमज दृढ होत आहे. काहीवेळा तर काही ढोंगी बाबा औषधा विना जादू मंत्राने एखाद्याचे आजार दूर करण्याचा दावा करतात, अशा प्रकरणात वेळ घालवत उपचार न घेतल्यामुळे काहींचे जीव देखील जातात. आता इतके सगळे प्रकार समोर आल्यानंतर तरी प्रत्येकाने जागरूक व्हायला हवे. आता गरज आहे प्रत्येकाने विज्ञान समजून घेण्याची. कारण खरे चमत्कार तर विज्ञानाने केले आहेत. तसेच गरज आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची वृत्ती ठेवण्याची, पुराव्यावर आधारित विचार करण्याची, नाहीतर असे कित्येक ढोंगी बाबा येतील आणि सहज फसवूण जातील. उलट समाजातील एक सुजान नागरिक म्हणून असे ढोंगी बाबा कुठे आढळले तर अशा घटानांची माहिती पोलिसांना देणे, त्याविरुद्ध उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच स्वतःसोबत इतरांनाही अशा घटनांबाबत जागरूक करणे ही काळाची गरज आहे
आणखी एक बाब म्हणजे अनेक भक्त देवावर असलेल्या श्रद्धेमुळे असल्या बाबांच्या आहारी जातात. कारण ढोंगी बाबा देवाचे नाव घेऊन दैवी चमत्कार दाखवत असतो. पण आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक नीट लक्षात घेणे गरजेचे आहे.