भारताने चॅम्पियन ट्रॉफी वन-डे क्रिकेट सामन्यात रविवार पाकिस्तानवर सहा विकेट आणि ४५ चेंडू राखून सहज मात केली. बाबर आझम, सौद शकील, महंमद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ हे पाकिस्तानचे खेळाडू भारताला जबरदस्त टक्कर देतील असे चित्र होते. मात्र, सुरुवातीला भारताच्या गोलंदाजांनी आणि नंतर विराट कोहलीने पाकिस्तानला शेवट पर्यंत डोकं वर काढण्याची संधी दिली नाही.
काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 6 विकेट्स राखून पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने भारताला दिलेले २४२ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 20 धावा, शुभमन गिलने 46, विराट कोहलीने 100, श्रेयस अय्यरने 56, हार्दिकने 8 धावा केल्या. यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
प्रथम नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर बाबर आझम (२३) आणि इमाम उल हक (१०) यांना फार काही करता आले नाही. मग सौद शकील (७६ चेंडूंत ६२), कर्णधार मोहम्मद रिझवान (७७ चेंडूंत ४६) व खुशदिल शाह (३९ चेंडूंत ३८) यांच्या धमाकेदार खेळीमुळे पाकिस्ताने मोठी धावसंख्या उभारली. मात्र, भारताने पाकिस्तानचे हे आव्हान सहज पार केले आणि शानदार विजय नोंदवला.