पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि पोलिसांनी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात मोठे ऑपरेशन केले आहे. या कारवाईत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे.
ही कारवाई गुप्त माहितीवर आधारित होती. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाने अरणगम जंगल परिसरात शोध मोहिम सुरू केली होती. मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एकाचा मृत्यू रविवारी झाला आणि दुसऱ्याचा सोमवारी.
अल्ताफ लाली हा पाकिस्तानचा नागरिक होता. तो बांदीपोरा परिसरात लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख नेता होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो नागरी लोकांवर हल्ले करायचा पण आता त्याच्याकडून पाकिस्तानी शस्त्रे, गोळ्या-बारुद, आणि पाकिस्तानशी संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या.
या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे आधारस्थान उद्ध्वस्त केले आहे. तसेच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीनगरमध्ये जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शिवाय त्यांनी नियंत्रण रेषेवरील (LoC) पाकिस्तानच्या हालचालींचीही माहिती घेतली.
एकप्रकारे ही कारवाई मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला दिलेले सशक्त प्रत्युत्तर आहे.अल्ताफ लालीसारखे दहशतवादी स्थानिक नागरिकांनाही त्रास देत असल्याने त्याचा खात्मा करणे गरजेचे होते. पण आता लालीच्या मृत्यूने लष्कर-ए-तैयबा संघटनेला मोठा धक्का बसला आहे.त्याच्या मृत्युनंतर आता काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🚨Top Lashkar-e-Taiba commander Altaf Lalli GUNNED DOWN in Bandipora encounter.
~ No cave deep enough. No forest dark enough.Every hand behind Islamic terror will meet this fate. Retaliation of #PahalgamAttack begins 🔥 pic.twitter.com/B9pNPAaYE5
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) April 25, 2025