Seema Haider: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध अधिक चिघळले असतानाच आता सीमा हैदरचा पती गुलाम हैदरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने सीमा, तिचा भारतीय पती सचिन मीणा आणि सीमाचा वकील एपी सिंह यांना लक्ष्य केले आहे. तसेच सीमा आणि सचिनला धमकी देखील दिली आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे की, “सीमाचे पाय आता भीतीने थरथर कापत आहेत. तिला वाटत असेल मी थकलो आहे, पण मी माझ्या चार मुलांसाठी लढत राहीन. आता निर्णयाची वेळ आली आहे. त्यांना कर्माचे फळ मिळेल. त्यांना एपी सिंह सुद्धा वाचवू शकणार नाही. सीमा, तुला यावेच लागेल.” पुढे त्याने तो सचिन किती दिवस जगेल?, असा सवालही व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी गुलाम हैदरचे सर्व दावे फेटाळू लावले आहेत. सीमाचे वकिल म्हणाले आहेत की, “सीमा पहलगाम हल्ल्याने दुःखी असून सध्या रुग्णालयात आहे. तिने नेपाळमध्येच सनातन धर्म स्वीकारला होता आणि सचिनशी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे.”
“सीमाची सर्व कागदपत्रे एटीएस, गृह मंत्रालय आणि भारत सरकारकडे जमा असून, तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. ती जामिनाच्या सर्व अटींचे पालन करत राबुपुरा येथील घरी राहत आहे. तिचा कायद्यावर विश्वास असून ती उत्तर प्रदेश सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत राहील,” असे देखील एपी सिंह म्हटले आहेत.