जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले त्यातच आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केली आहे. यामध्ये भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेल्सवर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. हे चॅनेल्स भारतविरोधी माहिती आणि अफवा पसरवत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीवरून ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत सरकारने ज्या महत्त्वाच्या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. या चॅनेल्समध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज यासारख्या मोठ्या मीडिया ग्रुप्सचा समावेश आहे. याशिवाय, माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचे यूट्यूब चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहे. काही प्रसिद्ध पत्रकार जसे की भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांचे चॅनेल्सही भारतात बंद करण्यात आले आहेत.
इतर काही चॅनेल्स –
द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांनाही ब्लॉक केले आहे. या सगळ्या चॅनेल्सवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात खोटी, दिशाभूल करणारी माहिती दिली जात होती, तसेच धार्मिक तणाव वाढवणारी सामग्री ही टाकली जात होती, असा आरोप भारत सरकारने केला आहे. म्हणूनच हे चॅनेल्स भारतात दाखवण्यावर बंदी आणण्यात आली आहे.
पाकिस्तान सरकारनेही भारताच्या अधिकृत ट्विटर खात्यावर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये डिजिटल युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरही वाढले आहेत. खर म्हणजे भारताने हा निर्णय पाकिस्तानमधून वाढत चाललेल्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतला आहे. मात्र या या कारवाईमुळे, दोन्ही देशांच्या डिजिटल क्षेत्रातील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत, आणि एक नवा डिजिटल संघर्ष सुरू झाला आहे.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, Government of India has banned following Pakistani YouTube channels for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and misinformation against
India, its Army and security… pic.twitter.com/2AjzeEuCsW— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2025