Operation Sindoor: पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी भावना देशवासीयांची होती. अखेर ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत दहशतवाद्यांना धडा शिकवला. पंरतु दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला मात्र भारताच्या या कारवाईमुळे चांगलीच मिरची लागली होती. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि त्यामुळे भारत पाकिस्तामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय आपल्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होते. तसेच भारतातील अनेक मंदिरांमध्ये भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी, विजयासाठी आणि आत्मविश्वासासाठी विशेष पूजा, हवन आणि प्रार्थना करण्यात आल्या होत्या. आजच्या या लेखात आपण कोणकोणत्या मंदिरात कशाप्रकारे भारतीय सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली, याचा आढावा घेऊयात.
– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिरात ७ मे ला सकाळी तिरंग्यासह सिंदूर अर्पण करण्यात आले. तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे भाविकांनी नृत्ये केले. तसेच पुजाऱ्यांनी देखील मंदिरात मिठाई वाटून एकमेकांचे अभिनंदन केले.
-७ मे रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बाबा गरीबनाथ मंदिरात बाबांना जलाभिषेक करताना भाविकांचा मोठा जमाव जमला. यावेळी भाविकांनी “हर हर महादेव” आणि “जय शिव बोल बम” अशा घोषणा देत ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी बाबा गरीबनाथांना दूध, दही, तूप आणि साखरेने स्नान घालण्यात आले. तसेच रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आणि त्यांची पूजा करण्यात आली. बाबा गरीबनाथ सनातन धर्माचे अनुयायी आणि देशाच्या सैनिकांचे रक्षण करतात असा विश्वास यावेळी भाविकांनी व्यक्त केला.
– ७ मे रोजी कर्नाटकमधील नांजनगुड येथील श्री श्रीकांतेश्वर मंदिरातही विशेष पूजा आयोजित करण्यात आली. पूजेदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच याच दिवशी कर्नाटकमधील मडिकेरीमध्ये, ओंकारेश्वर मंदिरात आणि कावेरी नदीचे जन्मस्थान असलेल्या तळकौवेरी येथे भारतीय सैनिकांसाठी विशेष पूजा आयोजित करण्यात आली .
– ८ मे रोजी महाराष्ट्रातील मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याबद्दल भाविकांनी भगवान गणेशाचे आभार मानण्यासाठी विशेष प्रार्थना आणि पूजा आयोजित केली.
– ८ मे रोजी वाराणसीतील बाबा काल भैरव मंदिरात ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आणि भारतीय सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी विशेष पूजा आयोजित करण्यात आली. तसेच मंदिरात दीपप्रज्वलन देखील करण्यात आले. एवढेच नाहीतर मंदिरात जमलेल्या भाविकांनी शहीदांना श्रद्धांजली देखील वाहिली.
– ८ मे २०२५ रोजी बेंगळुरूमधील गवी गंगाधरेश्वर मंदिरात ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सशस्त्र दलांच्या यशासाठी विशेष पूजा आणि होम आयोजित करण्यात आला. तसेच याच दिवशी कर्नाटकमधील काही राज्य-व्यवस्थापित मंदिरांमध्येही विशेष पूजा आणि होम आयोजित करण्यात आले.
– ८ मे रोजी कर्नाटकमधील म्हैसूर शहरातील चामुंडी टेकड्यांवरील श्री चामुंडेश्वरी मंदिरात रुद्रभिषेक आणि पंचमूर्त अभिषेकसह विशेष पूजा आयोजित करण्यात आली. या पूजेद्वारे सशस्त्र दलांना आणि सैनिकांना शत्रूंचा नाश करण्यासाठी शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
– ८ मे रोजी झारखंडमधील सिल्ली येथील स्थानिक लोकांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल ‘शौर्य सन्मान शोभा यात्रा’ काढून आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तेथील नागरिकांनी हनुमान मंदिर परिसरात तिरंगा फडकावला तसेच देशभक्तीच्या घोषणा देत आणि फटाके फोडत आपला आनंद साजरा केला.
– ८ मे रोजी झारखंडमधील रांची येथील पहाडी मंदिरात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी तेथील उपस्थित नागरिकांनी शिवलिंगाला पाणी आणि दूध अर्पण केले आणि भारतीय सैन्याच्या शौर्य आणि धैर्यात वाढ व्हावी आणि देशाचा विजयी ध्वज नेहमीच उंच राहावा यासाठी प्रार्थना केली.
– ८ मेला उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील केदारनाथ धाम मंदिरात ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आणि सैन्याच्या यशासाठी केदारनाथ धाम येथे रुद्राभिषेक करण्यात आला. पूजेदरम्यान, बाबा केदार यांनी भारतीय सैन्याला अधिक शक्ती प्रदान करावी, अशी भाविकांनी प्रार्थना केली.
-८ मे रोजी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन मंदिरात ‘गंगा आरती’ करण्यात आली आणि ही आरती देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या सुपुत्रांना अर्पण करण्यात आली. तसेच ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
-९ मे रोजी झारखंडमधील रांची येथील ऐतिहासिक पहाडी मंदिरात भारतीय सैन्याच्या यशासाठी भाविकांनी शिवलिंगाचा जलाभिषेक आणि दूधभिषेक केला आणि भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमात वाढ व्हावी आणि देशाचा विजयी ध्वज नेहमीच उंच राहावा यासाठी प्रार्थना केली.
– ९ मे रोजी उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ धाम मंदिरात हवन, पूजा आणि अर्चना करण्यात आली. यावेळी श्री बद्रीनाथ डिमरी धार्मिक मध्यवर्ती पंचायतीने दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी आणि भारताच्या तिन्ही सैन्याच्या शूर सुपुत्रांना आणि पंतप्रधान मोदींना शक्ती प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली.
– ९ मे रोजी दिल्लीतील छतरपूर येथील प्रसिद्ध श्री आद्य कात्यायनी शक्तीपीठ मंदिरात भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली होती.
– ९ मे रोजी गंगोत्री सेवा समितीने वारणसीतील गंगेच्या काठावरील दशाश्वमेध आणि केदार घाटावरील गंगेची आरती ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या सैनिकांना समर्पित केली. गंगा आरती दरम्यान, भारतीय सैन्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
– ९ मे रोजी झारखंडमधील रांची येथील ऐतिहासिक पहाडी मंदिरात भारतीय सैन्याच्या यशासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. भाविकांनी शिवलिंगाचा जलाभिषेक आणि दूधभिषेक केला.तसेच भाविकांनी भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमात वाढ व्हावी आणि देशाचा विजयी ध्वज नेहमीच उंच राहावा यासाठी प्रार्थना केली.
– ९ मे रोजी उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ धाम मंदिरात सैनिक आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी हवन, पूजा आणि अर्चना करण्यात आली. श्री बद्रीनाथ डिमरी धार्मिक मध्यवर्ती पंचायतीने दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी आणि भारताच्या तिन्ही सैन्याच्या शूर सुपुत्रांना आणि पंतप्रधान मोदींना शक्ती प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली.
– ९ मे रोजी दिल्लीतील छतरपूर येथील प्रसिद्ध श्री आद्य कात्यायनी शक्तीपीठ मंदिरात भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विजयासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
– ९ मे रोजी वारणसीतील गंगेच्या काठावर दशाश्वमेध आणि केदार घाटावर गंगेची आरती गंगोत्री सेवा समितीने ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या सैनिकांना समर्पित केली. गंगा आरती दरम्यान, भारतीय सैन्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
-१० मे रोजी तेलंगणा राज्यातील श्री कालेश्वर मुक्तेश्वर मंदिर, श्री वीरंजनेय स्वामी मंदिर, केतकी संगमेश्वर स्वामी मंदिर आणि काळभैरव स्वामी मंदिरांसह इतर काही मंदीरांमध्येही सैनिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यासाठी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, या सर्व घटना लक्षात येता भारताची एकता दिसून येते. या घटनांकडे देशाचे एकतेचे, देशावरच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिले जात आहे.